ओवळीये गावचे माजी उपसरपंच तथा भाजचे बूथ अध्यक्ष सागर सावंत आणि उपाध्यक्ष मनोज सावंत यांचा पुढाकार..
सावंतवाडी,दि.०९ : तालुक्यातील ओवळीये ग्रामपंचायत ते देवसु फौजदारवाडी या गावांना जोडणारा रस्ता खड्डे पडल्याने वाहतुकीसाठी धोकादायक ठरत होता.आज ओवळीये गावचे माजी उपसरपंच तथा भाजचे बूथ अध्यक्ष सागर सावंत आणि उपाध्यक्ष मनोज सावंत यांनी आपल्या स्वखर्चातून जेसीबी आणून या रस्त्याची डागडुजी केली आणि हा रस्ता वाहतुकीसाठी तात्पुरता सुरळीत केला.
दरम्यान त्यांनी केलेल्या या कामाबद्दल त्यांचे ओवळीये आणि देवसू गावातील ग्रामस्थांनी कौतुक केले व आभार मानले.
मात्र असे असले तरी पावसाळा अगदी जवळ येऊन टेपला आहे आणि पावसाळ्याआधी या रस्त्याचे डांबरीकरण होणे गरजेचे आहे,असे मत माजी उपसरपंच सागर सावंत यांनी कोकण दर्शन डिजिटल मीडियाशी बोलताना व्यक्त केले आहे.
तरी संबंधित खात्यातील अधिकाऱ्यांनी आणि शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन देवसु ते ओवळीये रस्ता प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून होत आहे.