मुंबई,३० : कोकण संस्थेच्या ११व्या वर्धापना दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या माध्यमातून गेली ११ वर्षे सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक,अनाथ आश्रम, महिला सक्षमीकरण अशा सर्वच क्षेत्रात वेगवेगळे उपक्रम करण्यात येतात. संस्थेच्या ११व्या वर्धापनदिनानीमित्त ३० ऑक्टोबरला रॅम्प वॉक, आदिवासी नृत्य कला, डान्स स्पर्धा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्वच स्पर्धामध्ये स्पर्धकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
वर्धापन दिनानिमित्त पुणे श्रीलोचन आश्रमात लहान मुलांचा दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कुमार प्रज्वल कुबल याने गायन आणि हार्मोनियम तर यांनी तबला साथ दिली. श्रीलोचन आश्रमातील सनाथ मुलांनी याचा आस्वाद घेतला.
काशिनाथ धुरू हॉल, दादर,मुंबई येथे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे स्नेहल मोरे, श्रेया राणे, रामचंद्र पाटील आणि विलोकीता पाटील यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले तर बक्षीस वितरण संस्थाध्यक्ष दयानंद कुबल यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला सुरज कदम,प्रीती पांगे, जयश्री खोपकर, हर्षला अमूप, नेहा वाकोडे, दर्शन कांबळे, सचिन धोपट, रामचंद्र पाटील, श्वेता सावंत, सिंड्रेला जोसेफ, बापू माने,तारा सांगळे, योगिता निजामकर, फरहान शेख, बिना अहिरे, सुनंदा मोरे, ऋतुजा पवार, मृणाल गायकवाड, नागेश पवार, राहुल शिंदे, साक्षी पोटे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय ओवळे आणि सलिना बुटेलो यांनी तर आभार स्वाती नलावडे यांनी मानले.