सावंतवाडी,दि.३: दिशा फाऊंडेशन आणि कलंबिस्त इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेत तीन वेगवेगळ्या गटात सांगेली घोलेवाडीची श्रावणी सचिन राणे, शिरशिंगे नं.१ ची आकांक्षा बाबाजी धोंड आणि सांगेली हायस्कूलची मयुरी बाळकृष्ण नाईक यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
निकाल पुढीलप्रमाणे:
१ली ते ४थी गट:
प्रथम: श्रावणी सचिन राणे (सांगेली घोलेवाडी)
द्वितीय: अन्वी पांडुरंग राऊळ (शाळा शिरशिंगे नं. १)
तृतीय: वेद विठ्ठल बिड्ये (वेर्ले नं. ३)
उत्तेजनार्थ: अर्णवी अनिल सनाम (सांगेली सनामटेंब)
५वी ते ७वी गट:
प्रथम: आकांक्षा बाबाजी धोंड (शिरशिंगे नं. १)
द्वितीय: सार्था विठ्ठल बिड्ये (वेर्ले नं. 1)
तृतीय: अन्वी अजित देसाई (शिरशिंगे नं. १)
उत्तेजनार्थ: गतिक धाकू जंगले (सांगेली हायस्कूल)
८वी ते १०वी गट:
प्रथम: मयुरी बाळकृष्ण नाईक (सांगेली हायस्कूल)
द्वितीय: अक्षरा अनिल राऊळ (शिरशिंगे हायस्कूल)
तृतीय: माधुरी महेश राऊळ (कलंबिस्त हायस्कूल)
उत्तेजनार्थ: शमिका संतोष धर्णे (सांगेली हायस्कूल)
स्पर्धेची रूपरेषा:
बुधवार, दिनांक ३० जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता कलंबिस्त प्रशालेत या स्पर्धेचे उद्घाटन पार पडले. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य भरत गावडे आणि प्रशालेचे मुख्याध्यापक अभिजीत जाधव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी परीक्षक महेश पेडणेकर आणि इतर शिक्षकही उपस्थित होते. एकूण ५० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून भरत गावडे,महेश पेडणेकर आणि किशोर वालावलकर यांनी काम पाहिले.
दिशा फाऊंडेशनचा उद्देश:
बक्षीस वितरण समारंभावेळी दिशा फाऊंडेशनचे सचिव दिपक राऊळ यांनी संस्थेच्या स्थापनेमागील उद्देश स्पष्ट केला. कलंबिस्त प्रशालेच्या १९९३या९४ च्या दहावीच्या बॅचने समाजातील गरजू घटकांना मदत करण्यासाठी २०२३ मध्ये या फाऊंडेशनची स्थापना केली. श्री राऊळ यांनी उपस्थितांना मानवता धर्म जपण्याचे आवाहन करत, आपल्याकडील काही अंश गरजूंना देऊन मदत करण्याचे महत्त्व सांगितले. तसेच ‘उत्तम वक्तृत्व हे एक उत्कृष्ट नेतृत्व असते,’ असे सांगत, वक्तृत्वाचा उपयोग समाजाच्या हितासाठी कसा करता येईल, यावर विचार करण्याचे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलंबिस्त प्रशालेचे सहाय्यक शिक्षक किशोर वालावलकर यांनी केले, तर सहसचिव सौ.विनिता कविटकर यांनी आभार मानले.
यावेळी दिशा फाऊंडेशनचे सचिव दिपक राऊळ,उपाध्यक्ष अनिल राऊळ, प्रवीण कुडतरकर, सहसचिव सौ.विनिता कविटकर, सौ. कल्पना सावंत, राजू गोवेकर यांच्यासह कलंबिस्त प्रशालेचे मुख्याध्यापक अभिजीत जाधव, भरत गावडे आणि इतर शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिके देऊन गौरवण्यात आले.








