विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परब आणि तालुकाप्रमुख रुपेश राऊत यांचे आयोजन..
सावंतवाडी, दि.०५: उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आज आदिनारायण मंगल कार्यालय सावंतवाडी येथे शिवसेना सचिव खासदार श्री विनायक राऊत यांच्या हस्ते तालुक्यातील शिवसेनेचे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य यांचा जाहीर सत्कार व निवडणूक लढवून पराभूत झालेल्या उमेदवारांचा शनिवार ४ रोजी सन्मान करण्यात आला.
यावेळी व्यापीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, सावंतवाडी विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परब, माजी सभापती बाळा गावडे, महिला जिल्हा संघटिका सौ.जान्हवी सावंत, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, तालुका प्रमुख रूपेश राऊळ, तालुका संघटक मायकल डिसोजा, ज्येष्ठ सरपंच दाजी गावकर,अजित सांगेलकर,शब्बीर मणियार, काँग्रेस माजी तालुकाध्यक्ष बाब्या मापसेकर,संतोष पाताडे, पुरुषोत्तम राऊळ आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख संजय पडते आणि खासदार विनायक राऊत यांनी मंत्री दीपक केसरकर आणि खासदार नारायण राणे यांच्यावर जोरदार प्रहार केला.