कु.वीरा राजीव घाडी जिल्ह्यात प्रथम
सावंतवाडी,दि .१३: शैक्षणिक गुणवत्तेची ओळख ठरलेली पूर्ण प्राथमिक शाळा सावंतवाडी नंबर ४ यंदा शिष्यवृत्ती परीक्षेतही झळकली आहे. संपूर्ण जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात या शाळेने आपली छाप पाडत, दहापैकी सहा विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे.
शहरी विभागातील गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेले विद्यार्थी खालील प्रमाणे
कु. वीरा राजीव घाडी जिल्ह्यात प्रथम क्रमांक,
कु. मानवी महेश घाडी जिल्ह्यात २३ वी,
कु. पार्थ अशोक बोलके जिल्ह्यात २५ वा,
कु. हार्दिक अनिल वरक जिल्ह्यात ३१ वा,
कु. काव्या अमित तळवणेकर जिल्ह्यात ४२ वी,
कु. स्वरा गोविंद शेरलेकर जिल्ह्यात ५० वी आली.
या विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश ही त्यांच्या मेहनतीची आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाची फळं आहे. शाळेच्या दहामधील सहा विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवणे ही एक अभिमानास्पद बाब आहे.
शाळेच्या मुख्याध्यापिका लक्ष्मी धारगळकर यांनी सांगितले की, “ही आमच्या विद्यार्थ्यांनी आम्हाला दिलेली गुरुपौर्णिमेची गुरुदक्षिणा आहे. आमच्या संपूर्ण शिक्षकवृंदाच्या मेहनतीला आणि विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना हे यश समर्पित आहे.
विशेष करून शिक्षक महेश पालव, पूजा शिंदे यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष तळवणेकर, केंद्रप्रमुख कमलाकर ठाकूर, अंजना घाडी, प्रणिती सावंत, शिल्पा जाधव, दक्षता गवस, वर्षा नाईक, अन्वी धोंड या सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.