संपर्कप्रमुख शैलेश परब यांच्या वतीने सावंतवाडीत आयोजन.. खासदारांच्या हस्ते करण्यात येणार सत्कार..
सावंतवाडी, दि.०३: तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांचा सावंतवाडी विधानसभा मतदार संपर्कप्रमुख शैलेश परब यांच्या वतीने शनिवार ४ फेब्रुवारीला सावंतवाडी येथील आदिनारायण मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे. नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचा सत्कार शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते आणि सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास सावंतवाडी विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परब यांच्यासह जिल्हाप्रमुख संजय पडते महिला जिल्हा संघटक जानवी सावंत सावंतवाडी पंचायत समिती माजी सभापती चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे शाल श्रीफळ आणि भेट वस्तू देऊन सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा सन्मान केला जाणार आहे ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टी सोबत शिंदे गट सामील झाला असला तरी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघांमध्ये काहीही फरक पडलेला नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या शिवसैनिकानी प्रामाणिकपणे प्रचार यंत्रणा राबवून काम केले त्यामुळे महत्त्वाच्या ग्रामपंचायतीवर सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य निवडून आले आहेत तरी
सावंतवाडी तालुक्यातील सर्व नवनिर्वाचित सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन तालुका प्रमुख रुपेश राऊळ उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार तालुका संघटक मायकल डिसोजा तालुका महिला संघटक रश्मी माळवदे यांनी केले आहे.