वैभववाडी नगरपंचायतीच्या उबाठा पक्षाची नगरसेविका सानिका रावराणे भाजपात

0
33

मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते केला भाजपामध्ये प्र

वैभववाडी,दि.२५: वैभववाडीत उबाठा पक्षाला मोठा धक्का बसला आहे. वैभववाडी नगरपंचायत वार्ड क्रमांक १७ च्या नगरसेविका सानिका सुनील रावराणे, वाभवे सोसायटीचे चेअरमन संतोष मांजरेकर आणि सुनील रामचंद्र रावराणे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.

महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांच्या हस्ते या तिघांचा भाजपामध्ये प्रवेश झाला. नामदार नितेश राणे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करताना यामुळे भाजपाची ताकद अधिक वाढेल,असे सांगितले.

नगरसेविका सानिका रावराणे यांच्या भाजप प्रवेशामुळे नगरपंचायत सभागृहामध्ये पक्ष अधिक मजबूत झाला असून उभाठा पक्षाला हा मोठा धक्का मानला जात आहे.

यावेळी नगराध्यक्ष नेहा माईणकर, दिलीप रावराणे, दीपक माईणकर आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here