सावंतवाडी,दि.२३: अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातर्फे सावंतवाडी भटवाडी येथील ब्राह्मण देवालय येथे आज गुरुवार रोजी श्री स्वामी समर्थ पादुकांच्या पालखीचे आगमन झाले. सायंकाळी शहरातून वाजत गाजत स्वामी पादूका मिरवणूक काढण्यात आली. शहरातील स्वामी भक्तांनी पादूका दर्शनाचा लाभ घेतला.
अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातर्फे सावंतवाडी भटवाडी येथील ब्राह्मण देवालय येथे स्वामी पादुकांचे पूजन करण्यात आले. विविध धार्मिक कार्यक्रमानंतर सायंकाळी सावंतवाडी शहरात पादुकांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. रात्री निरवडे येथील दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोगाच आयोजन करण्यात आले होते. सालाबादप्रमाणे मोठ्या उत्साहात हा स्वामी पादुका दर्शन सोहळा संपन्न झाला. या पालखी सोहळ्यात माजी नगरसेविका दिपाली भालेकर, कुणाल शृंगारे, दिलीप भालेकर, बाळा सावंत, विजय सावंत, दीपक सावंत, चंदन नाईक, भार्गव धारणकर, साईश परब, अमित वाळके, अभिनंदन राणे, संतोष खंदारे, संदेश मोर्ये आदींसह स्वामीभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.