सोनुर्ली येथील श्री देवी भवानी मातेचा त्रैवार्षिक गोंधळोत्सव उत्सहात संपन्न..

0
35

सावंतवाडी,दि.२२: सोनुर्ली पाक्याचीवाडी येथील श्री देवी भवानी मातेचा त्रैवार्षिक गोंधळोत्सव मंगळवारी उत्सहात पार पडला. सकाळ पासुन रात्रौ उशिरापर्यंत देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

सोनुर्ली पाक्याचीवाडी येथे हिराप बंधूची कुलदेवता म्हणून श्री देवी भवानी मातेचे मंदिर आहे समस्थ सोनुर्ली ग्रामस्थ व भाविक देवीचा गोंधळोत्सव एकत्र येथे मोठ्या उत्साहात दर तीन वर्षानी साजरा करतात. यावर्षी मंगळवारी हा उत्सव साजरा झाला. यानिमित्त सकाळी देवीची विधीवत पुजा पार पडल्यानंतर दुपारी बकरा मानविण्याचा कार्यक्रम गावचे प्रमुख मानकरी यांच्या उपस्थितीत पार पडला. यानंतर देवीच्या दर्शन ओटी भरणे,केळी ठेवणे आदी कार्यक्रमाला सुरवात झाली. सायंकाळी चार वाजता महाप्रसादाला सुरवात झाली. यावेळी शेकडो भक्तांनी याचा लाभ घेतला. उशिरापर्यंत हा कार्यक्रम सुरु होता. त्यानंतर रात्रौ गोंधळाच्या मुख्य कार्यक्रमाला सुरवात झाली. यावेळी प्रथेप्रमाणे मांडमाडावळ आदी झाल्यानंतर गोंधळ घालण्याचा व देवीची मशाल फिरविण्याचा कार्यकम झाला. यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी व ग्रामस्थ मंडळीनी गर्दी केली होती. हा कार्यक्रम तब्बल दोन अडीज तास सुरु होता. दरम्यान गोवा मुंबई येथील भाविक भक्तास राजकीय,सामाजिक व विविध क्षेत्रातील भाविकांनी उपस्थिती दर्शवित देवी भवानीचे दर्शन घेतले.

गोंधळ घालण्याचा कार्यक्रमानंतर वालावलकर दशावतार कंपनीचा नाट्य झाला. त्यानंतर पहाटे पुन्हा गोंधळ घालणे व देवीची मशाल फिरविण्याचा कार्यक्रमानंतर आणि देवीच्या अवसाराच्या कौलाने या उत्सवाची सांगता झाली. दर तीन वर्षानी होणार्या या उत्सवासाठी मुंबईस्थित हिराप बंधू व ग्रामस्थ खास गावी दाखल झाले होते. एकप्रकारे भक्तिमय वातावरणात मंदिर परिसरात पाहायला मिळाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here