सिंधुदुर्ग प्रेस क्लब च्या पुरस्काराचे उद्या शुक्रवार १७ रोजी वितरण..

0
22

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती..

सावंतवाडी,दि.१७ : सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लब चे पुरस्कार जाहीर झाले असून त्याचे वितरण उद्या शुक्रवारी १७ जानेवारीला दुपारी तीन वाजता महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर व माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून कार्यक्रमाला जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी हे प्रमुख पाहुणे असणार आहेत.हा कार्यक्रम सावंतवाडीतील काझीशहाबुददीन हाॅल मध्ये होणार आहे.अशी माहिती सिंधुदुर्ग प्रेस क्लब चे अध्यक्ष अनंत जाधव, सचिव राकेश परब यांनी प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकातून दिली आहे.
सिंधुदुर्ग प्रेस क्लब चे पुरस्कार सावंतवाडीतील पत्रकार रूपेश हिराप यांना तर प्रेस क्लब चा डिजिटल मिडिया पुरस्कार आनंद धोंड, प्रेस क्लब युवा पत्रकार पुरस्कार दोडामार्ग येथील प्रतिक राणे तर प्रेस क्लब कर्मचारी संघटना पुरस्कार गुरूनाथ कदम यांना जाहीर करण्यात आले आहेत.

या पुरस्कारांचे वितरण राज्याचे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या हस्ते होणार आहे. तर कार्यक्रमाला माजी मंत्री दीपक केसरकर यांच्यासह जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी तसेच प्रेस क्लब चे सर्व पदाधिकारी सावंतवाडीतील पत्रकार उपस्थित राहणार आहेत.यावेळी प्रेस क्लब च्या वतीने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर याचा खास सत्कार ही करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here