शेतकऱ्यांना विश्वासात न घेता सुरू केलेल्या कॅनलचे काम मनसेने रोखले..

0
151

…प्रसंगी पाटबंधारे सावंतवाडी विभागाला घेराव घालू… म.न.वि.से जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार

सावंतवाडी, दि.२८: येथील निगुडे आसवेकर वाडीच्या बाजूने जाणाऱ्या कॅनल चे काम मनसेने रोखले येथील शेतकऱ्यांना विश्वासात न घेता त्यांना काहीही नोटीस न देता पाटबंधारे विभाग तसेच संबंधित ठेकेदार यांनी मनमानी कारभार करत शेतकऱ्यांच्या जमिनीतून खोदकाम चालू केले सदर बाब लक्षात येताच मनसेचे पदाधिकारी सुनील आसवेकर व मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सदर काम रोखले व या ठिकाणी संबंधित कंपनीचे ठेकेदार तसेच पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांना या ठिकाणी बोलवले असून जोपर्यंत शेतकऱ्यांना विश्वासात घेत योग्य तो मोबदला मिळत नाही तोपर्यंत सदर काम चालू करू देणार नाही असा इशारा उपस्थित मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

तसेच योग्यरीत्या परवानगी घेऊन काम न केल्यास व शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास पाटबंधारे सावंतवाडी विभागाला घेराव घालू असा इशारा माजी शहरअध्यक्ष तथा म.न.वि.से जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांनी दिला. यावेळी म.न.वि.से जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार बांदा शहराध्यक्ष बाळा बहिरे माजी तालुकाउपाध्यक्ष सुनील आसवेकर माजी विभाग अध्यक्ष मिलिंद सावंत अनिल जाधव गजानन सावंत तुषार सावंत लक्ष्मण सावंत बाबला सावंत आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here