उद्याचा १० डिसेंबरचा वाढदिवस होणार साधेपणाने साजरा..नितीन गावडे यांची माहिती
सावंतवाडी,दि.०९: सकल मराठा समाजाचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष सीताराम गावडे उद्या १० डिसेबर या आपल्या वाढदिवसा दिवशी आपल्या कोकण लाईव्ह ब्रेकींग न्युज चॅनेल कार्यालयात सकाळी ११ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत उपस्थित राहून आपल्या शुभेच्छांचा स्विकार करणार आहेत अशी माहिती सकल मराठा समाजाचे उपाध्यक्ष नितीन गावडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
दरवर्षी सकल मराठा समाजाचे अध्यक्ष तथा कोकण लाईव्ह ब्रेकींग न्युज चॅनेल चे संपादक सीताराम गावडे यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून साजरा केला जातो,या वर्षी काही कौटुंबिक अडचणी मुळे सीताराम गावडे यांच्या निवासस्थानी केक कापण्याचा कार्यक्रम होणार नाही ते फक्त आपल्या शुभेच्छांचा स्वीकार करणार आहेत याची मराठा समाज बांधवांनी व कोकण लाईव्ह ब्रेकींग न्यूज चॅनेल च्या सर्व हितचिंतकांनी नोंद घ्यावी असे आवाहन नितीन गावडे यांनी केले आहे.