अंध बांधवांनी अपक्ष उमेदवार सौ.अर्चना घारे परब यांची भेट घेऊन.. विजयाच्या दिल्या शुभेच्छा..

0
16

सौ.घारे यांनी मानले आभार.. प्रेमाने केली विचारपूस

सावंतवाडी,दि.३१ : विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून उमेदवार,लोकप्रतिनिधी यांच्या मतदारांशी गाठीभेटी वाढल्या आहेत.
दरम्यान सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात एकापेक्षा एक मातब्बर उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्याने येथे चौरंगी लढत होण्याची दाट शक्यता आहे. यात सलग तीन वेळा निवडून आलेले आणि विद्यमान शिक्षण मंत्री पदावर असलेले दीपक केसरकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तिकीट मिळेल,अशी अपेक्षा असताना ती जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेला गेल्यामुळे अपक्ष मैदानात उतरणाऱ्या अर्चना घारे – परब, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात प्रवेश घेऊन महाविकास आघाडीतर्फे लढणारे माजी आमदार राजन तेली तसेच अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले युवा नेते विशाल परब यांच्यात चुरस होणार आहे.

मात्र अर्ज छाननी नंतर जेव्हा अपक्ष लढणाऱ्या एकमेव महिला अर्चना घारे – परब यांचा अर्ज वैध ठरला. तेव्हा समाजात ‘दिव्यांग’ म्हणून ओळख असलेले आणि असे असतानाही ‘हृदयातून डोळस’ असलेले हरी भरत गावकर (मळगाव), जयेंद्र सिताराम राऊळ (कलंबिस्त), विठ्ठल भास्कर शिरोडकर (कुडाळ) आणि अरविंद नारायण लिंगवत (वेर्ले) ह्या चारही अंध असलेल्या बांधवांनी अर्चना घारे – परब यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी अर्चना घारे – परब यांनी दिव्यांग बांधवांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले व आपुलकीने विचारपूस केली. तेव्हा दृष्टी गमावलेल्या मात्र हृदयातून डोळस असलेल्या दिव्यांग बांधवांनी ”अर्चनाताई तुम्ही लढा, आम्ही तुमच्यासोबत आहोत.!”, अशी आपुलकीची साथ अर्चना घारे यांना दिली. यावेळी उपस्थित असलेले अनेकांचे डोळे आपसूकच पानावले होते.
दरम्यान अर्चना घारे यांनीही आपण कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक लढविणार असल्याचे सांगत, येथील बेरोजगारी, आरोग्य असुविधा तसेच इतर मूलभूत सुखसुविधा यांपासून हा मतदारसंघ वंचित असल्याचे सांगितले. तसेच आपला लढा हा विकासापासून वंचित ठेवणाऱ्या विरुद्ध असल्याचेही सांगितले. आज माझ्या कार्यालयात उपस्थित असलेल्या दिव्यांग बांधवांची ही साथ बघून माझा उत्साह अजून वाढला असून निवडणुकी अगोदरच अशा सकारात्मक आशीर्वादांमुळे लढण्याला बळ मिळत असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
यावेळी त्यांच्यासोबत विनायक परब, वैभव परब आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here