गोव्याच्या कसिनो चा प्रतिनिधी नको; हक्काचा आमदार नितेश राणेच पुन्हा हवा..

0
9

कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार निलेश राणे

कणकवली,दि.२८: आपण रणरणत्या उन्हात एवढ्या मोठ्या संख्येने जमलात.हे भाग्य सगळ्यांना लाभत नाही. नितेश राणे हे तुमच्या भाग्यामध्ये आहे. तुमच्या नशिबामध्ये आहे आणि हे तुम्ही अथक कष्टातून कमावलेले आहे. तुम्ही दहा वर्ष इकडच्या जनतेची सेवा केली आहे. कुठल्याही टोकाला जाऊन येथील जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला .कधी स्वतःची परवा केली नाही. स्वतःकडे दुर्लक्ष केले. पण माझ्या या मतदारसंघाच्या माता-भगिनींकडे माझ्या जनतेकडे कधीही कोणी वाकडया नजरेने बघता कामा नये. असे तुम्ही काम केले आहे त्याचाच प्रत्यय म्हणून तुम्हाला हा जनसमुदाय रणरणत्या उन्हात समोर दिसतो आहे.त्यामुळे आम्हाला गोव्याच्या कसिनो चा प्रतिनिधी आपल्याकडे आमदार नको तर आपला हक्काचा आमदार नितेश राणे पुन्हा हवा असे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार निलेश राणे यांनी आवाहन केले. ते कणकवली येथे आमदार नितेश राणे यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर जाहीर सभेला संबोधित करत होते.
आता नितेश राणे यांचे भाषण ऐकल्यानंतर आपल्याला सगळ्यांना लक्षात आलं असेल की माणूस किती परिपक्व झालेला आहे. या दहा वर्षांमध्ये फक्त काम बोललं पाहिजे. मी नाही तर माझ्या जनतेच्या तोंडातून माझ्या विकासाचं काम निघालं पाहिजे. ही नितेश राणे यांची कार्यपद्धती सर्वांना भावली आहे. विरोधकांची परवा न करता काम करा. मी आता व्यासपीठावर आल्यानंतर प्रभाकर सावंत यांच्या कानात विचारले इकडे विरोधक कोण आहे ? मला माहित देखील नव्हतं. गोव्याच्या कॅसिनोचा प्रतिनिधी आपल्याकडे आमदार नको. आपल्याला आमदार आपल्या हाडामासाचा हवा. महाराष्ट्र मध्ये आता वेगळी ओळख स्वतःची निर्माण करायची गरजच नाही असा आमदार आपल्याला कणकवली मतदारसंघांमध्ये मिळाला आहे तोच आमदार तिसऱ्यांदा पुन्हा आम्हाला आमदार म्हणून निवडून द्यायचा आहे तोच आम्हाला आमदारावा असे आवाहन यावेळी निलेश राणे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here