सावंतवाडी,दि. १५ : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्या अंतर्गत माजी आमदार राजन तेली यांनी शिफारस केलेली रस्त्याची कामे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी मंजुर केली आहेत. राजन तेली यांनी सावंतवाडी मतदार संघातील २० किमी पर्यंतच्या रस्त्यांच्या कामाची शिफारस ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे केली होती. ही कामे मंत्री गिरीष महाजन यांनी मंजुर केली आहेत.
यामध्ये सावंतवाडी सांगेली घोलेवाडी, सावरवाड रस्ता ग्रा.मा.125 2 .00 कि.मी 2 कोटी, सावंतवाडी आंबेगाव रुपवनवाडी रस्ता ग्रा.मा.155 3.00 कि.मी 2.5 कोटी,सावंतवाडी इन्सुली गावठण शिवाजी चौक ग्रा.मा.283 ते गावडेवाडी, चर्मकारवाडी ग्रा.मा.288 कोंडवाडा एक्साइज ऑफिस ते सावंतटेंब ते निगुडे पाटीलवाडी ते शेर्ला रस्ता मजबुतीकरण करणे 3.00 कि.मी 1.75 कोटी, सावंतवाडी आरोंदा सुभेदारवाडी सावरजुवा गोवा हदद मार्ग ग्रा.मा.351 1.500कि.मी 1.75 कोटी,सावंतवाडी कोलगाव चव्हाटा डोंगरवाडी रस्ता ग्रा.मा.164 1.200कि.मी 90 लक्ष, सावंतवाडी तळवणे मुख्य रस्ता ते जंजीर हरीजनवाडी मार्ग ग्रा.मा.356 2 .00 कि.मी 1.75 कोटी
,सावंतवाडी मळेवाड पोस्ट ते मुसळेश्वर मंदिर मार्ग ग्रा.मा.324 1.300 कि.मी 1.25 कोटी,दोडामार्ग कळणे उगाडे मुख्य रस्ता ते कोनाळ रस्ता ग्रा.मा. 2 .00 कि.मी 1.75 कोटी, दोडामार्ग मणेरी तळेवाडी ते धनगरवाडी रस्ता ग्रा.मा.93 3.00 कि.मी 2.5 कोटी, वेंगुर्ला रेडी गावतळे गोळतू रस्ता ग्रा.मा.165 2 .500कि.मी 2 कोटी, वेंगुर्ला आडेली वजराठ पिंपळाचे भरड रस्ता ग्रा.मा.86 3.500 कि.मी 2.80 कोटी,वेंगुर्ला मातोंड सावंतवाडा ते नेवाळे रस्ता ग्रा.मा.119 1.60 कि.मी. 1.30 कोटी,वेंगुर्ला रेडी विठोबा मंदीर ते सिदधेश्वर मंदीर
1.200 कि.मी. 1.30 कोटी,वेंगुर्ला पेंडूर चिरेखण दळवीवाडी,नाईकवाडी,न्हावेली रस्ता मजबुतीकरण करणे 2.700 कि.मी 2 कोटी 88 लक्ष,वेंगुर्ला प्रजिमा 56 ते पेंडूर सातवायंगणी ते पेंडूर रस्ता मजबुतीकरण करणे 1.200 कि.मी 90 लक्ष
अशी कामे राजन तेली यांच्या शिफारशीनुसार मंजूर करण्यात आल्याची माहिती श्री तेली यांनी आपल्या प्रसिध्दी पत्रकामार्फत दिली.