विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर सौ. सुनिला नवांगुळ यांच्या हस्ते उद्घाटन
सावंतवाडी,दि.१३: विजयादशमीचे औचित्य साधून सावंतवाडी येथील प्रसिद्ध डॉक्टर राजेश नवांगुळ यांनी आपल्या आईच्या हस्ते टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचे उद्घाटन केले.
यावेळी बोलताना त्यांच्या आई म्हणाल्या मला आनंद होत आहे, माझ्या मुलाने आई बाबा होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना आई टेस्ट ट्यूब बेबी केंद्राच्या माध्यमातून सेवा देणाऱ्या केंद्रांचे माझ्या हस्ते उद्घाटन झाले आहे असे प्रतिपादन सौ सुनिला नवांगुळ यांनी केले तर या केंद्रात येणाऱ्या प्रत्येकाचे आई बाबा होण्याचे स्वप्न साकार व्हावे अशी प्रार्थना करते, असे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ सुधाकर नवांगुळ, डॉ केदार पडते यांनी शुभेच्छा दिल्या.
यशराज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सावंतवाडी मध्ये अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज “आई टेस्ट ट्यूब बेबी” सेंटरचे उद्घाटन विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर सौ. सुनिला सुधाकर नवांगुळ (मातोश्री) यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गोवा येथील डॉ. केदार पडते, डॉ. सुधाकर नवांगुळ, डॉ. राजेश नवांगुळ, सौ मनिषा नवांगुळ, यश नवांगुळ, डॉ. गायत्री शर्मा (पालयेकर), सौ मीना राजू मदने, सौ बिना किरण जोशी, अँड नकुल पार्सेकर, डॉ कश्यप देशपांडे, डॉ मिलिंद खानोलकर, डॉ रेवण खटावकर, डॉ विनायक लेले, डॉ अनिश स्वार, डॉ विद्यानंद सावंत, सौ. देशपांडे, सौ उषा परब, अँड प्रकाश परब, डॉ संजना देसकर, सौ तृप्ती पार्सेकर, डॉ अमेय स्वार, डॉ सुरज देसकर, डॉ विद्याधर तायशेटे डॉ पावसकर यांच्यासह वैद्यकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ राजेश नवांगुळ यांच्या आई सौ सुनिला नवांगुळ व वडील डॉ सुधाकर नवांगुळ, डॉ केदार पडते यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ झाल्यावर टेस्ट ट्यूब बेबी केंद्राची माहिती डॉ राजेश नवांगुळ यांनी दिली तर डॉ राजेश नवांगुळ व सौ मनिषा नवांगुळ यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आई टेस्ट ट्यूब बेबी केंद्र आणि डॉ राजेश नवांगुळ यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.