दोडामार्ग,दि.११ : श्री नवदुर्गा सांस्कृतिक नवरात्रौत्सव मंडळ सासोली येथे उत्कृष्ट निवेदन केल्याने निवेदक भूषण सावंत यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
भूषण सावंत हे १६ वर्षे पञकार म्हणून कार्यरत असून ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी निवेदन करतात. सासोली येथे देखील नवरात्रौत्सव सांस्कृतिक कार्यक्रमांत त्यांनी उत्कृष्ट निवेदन केल्याने व्यासपीठावरील शिवसेना दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेश प्रसाद गवस यांच्या हस्ते भूषण सावंत यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन उपस्थित जनसमुदायासमोर सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सासोली सरपंच बळीराम शेटये, माजी सभापती दयानंद धाऊसकर, युवासेना तालुकाप्रमुख भगवान गवस, माजी उपसरपंच लक्ष्मीकांत करमळकर, महिला दोडामार्ग तालुकाप्रमुख सौ.सानवी सुशांत गवस, सज्जन धाऊसकर, ग्रामपंचायत सदस्य गुरुदास सावंत, सुमित गवस, सुभाष गवस, अंकुश नाईक, अविनाश नाईक आदी उपस्थित होते.