…तर सचिवपदी राजेश रमेश मयेकर यांची एकमताने निवड
सावंतवाडी,दि.२३: निगुडे श्री देवी माऊली नवरात्र उत्सव समितीचे बैठक माजी अध्यक्ष नारायण शांताराम राणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी नूतन कार्यकारणी मध्ये अध्यक्षपदी माजी सरपंच समीर गावडे, उपाध्यक्षपदी नाना खडपकर,सचिवपदी राजेश मयेकर, तर खजिनदारपदी बाबली तुळसकर यांची एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी सभासद उमेश गावडे, संदीप राणे, गुरुदास गवंडे, प्रताप गावडे, पुरुषोत्तम उर्फ गुरु गावडे, मयुरेश गावडे, बापू अर्जुन गावडे, दिगंबर गोविंद गावडे, राजा रूबजी, बापू भास्कर गावडे, अजित तुळसकर, अमित निगुडकर, प्रकाश देसाई, गुरुदास निगुडकर, संदीप नाईक, मनोहर नाईक, आणि रोहिणी गावडे यांची कार्यकारणी मध्ये निवड करण्यात आली सर्व नवीन कार्यकारणी यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच नवरात्र उत्सवात निगुडे माऊली मंदिरात नऊ दिवस विविध कार्यक्रम दुपारी महाप्रसाद, महाआरती असे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आलेले आहेत असे अध्यक्ष समीर गावडे व सचिव राजेश मयेकर यांनी सांगितले.
यावेळी मानकरी शांताराम गावडे, पांडुरंग गावडे, गंगाराम गावडे, शिवा सावळ, महादेव नाईक, श्याम सावंत, देवस्थान समितीचे अध्यक्ष सत्यवान राणे, सचिव गुरुदास गवंडे, खजिनदार महेश गावडे, शंकर निगुडकर, महेंद्र गावडे, ,बाबाजी गोविंद गावडे, दीपक गावडे, दशरथ तुळसकर, संतोष सावळ आदी ग्रामस्थ व मानकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.