सकल मराठा समाजाने अद्याप निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला नाही -सीताराम गावडे

0
17

इच्छूक उमेदवारांनी आपली कागदपत्रे गोळा करावी -अंतीम निर्णय मनोज जरांगे पाटील घेतील

सावंतवाडी,दि.१६: सकल मराठा समाजाने विधानसभा निवडणुकीत उतरण्याची भूमिका अद्याप पर्यंत जाहिर केली नाही,मात्र सकल मराठा समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास समाज निवडणूक लढवणार आहे, त्यामुळे जे कोण इच्छुक असतील त्यांनी आपली कागदपत्रे तयार ठेवावीत असे समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे,अद्याप कोणताही उमेदवार निश्चित केला नाही अशी माहिती सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
जे कोण निवडणूक लढण्यास इच्छुक असतील त्यांनी आपली कागदपत्रे तयारी ठेवावीत,इच्छूकांची यादी समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या कडे पाठविली जाईल व जो निवडून येण्यास पात्र उमेदवार असेल त्याचे नाव सर्वानुमते ठरविण्यात येईल असे सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here