कणकवली,दि.११: आज संविधान जागर यात्रेच्या निमित्ताने राज्यातील आंबेडकरी जनतेला विश्वासात घ्या आणि देश वाचवायचा असेल तर शिवशक्ती आणि भीमशक्ती ची एकजूट करूया असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मला संविधान लिहिताना जास्त कष्ट पडले नाहीत कारण माझ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य होते. भारतात फक्त बाबसाहेबांचेच संविधान चालणार. संविधानाकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांचे डोळे आम्ही जाग्यावर ठेवणार नाही.असा इशारा भाजप आमदार नितेश राणे यांनी दिला. ते कणकवलीत संविधान जागर यात्रेत बोलत होते.
संविधान जागर यात्रेचे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आगमन होत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानांचे विचार मांडणे हा योगायोग आहे. छत्रपतींना मानणारा प्रत्येक मावळा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आपला बाप मानतो. संविधान बदलणार ही आवई उठविणाऱ्यांना संविधान जागर यात्रा ही चपराक आहे.असे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.
संविधान जागर यात्रेच्या कणकवली येथल छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील जाहीर सभेत आमदार नितेश राणे बोलत होते. यावेळी अँड. वाल्मिक निकाळजे, नितीन मोरे, राजेंद्र गायकवाड, श्रीमती ठोकळे, श्रीमती भालेकर, आकाश आंभोरे, नामदेव जाधव, अंकुश जाधव, अजित कदम, सुशील कदम आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
यापुढे संविधानाचे रक्षण करू अशी शपथ घेऊ हेच या संविधान जागर यात्रेचे यश आहे. उद्या निवडणूक तोंडावर असताना कोणीतरी आपल्या गावात वाडीत येऊन सभाघेवून सांगेल की संविधान बदलणार आहेत, आणि तुमच्या मनात भीती घालेल. आजची संविधान जागर सभा या भुलथापेला उत्तर आहे. बांगलादेश,श्रीलंका मध्ये डॉ.बाबासाहेबांचे संविधान नाहीय म्हणून आज तिथे अराजक माजले आहे. आपल्या भारतात संविधान आहे. भारतात केवळ बाबसाहेबांचेच संविधान चालणार. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक संसदेत आले तेव्हा उध्दव ठाकरे चे खासदार चर्चा पूर्वी का पाळले ? राहुल गांधीला स्वतःची जात माहिती नाही. या चांगल्या व्यासपीठावर राहुल गांधी चे नाव घेऊ नकात. राहुल गांधी ला संविधानात किती पाने आहेत याचे उत्तर लोकसभेत देता आले नाही. अशा राहुल गांधीच्या उमेदवारांना आपण मते देणार आहोत काय ? दुसरे उद्धव ठाकरे आणि त्याचे कुटुंब कधी ६ डिसेंबर च्या महानिर्वाण कार्यक्रमात मुख्यमंत्री व्हायच्या आधी कधी सामील झालेले होते काय ? एक फोटो दाखवा. असे थेट आव्हान आमदार नितेश राणे यांनी दिले. दलित वस्तीत गेल्यानंतर गाडीत बसल्यावर हॅन्ड सॅनिटायजर ने उद्धव ठाकरे हात धुवून घेतात. वक्फ बोर्ड विधेयकावेळी उबाठा चे ९ खासदार सभागृहाबाहेर का गेले याचा जाब मुस्लिमांनी मातोश्री बाहेर एकवटून उद्धव ठाकरेंना विचारला आहे.