जल जीवन मिशन योजनेतील कामांच्या तक्रारी शिवसेना तालुकाप्रमुखांकडे द्या

0
28

शिवसेना प्रवक्ते मंदार केणी यांचे लोकप्रतिनिधी व नागरिकांना आवाहन

सिंधुदुर्ग,दि.०७: कुडाळ मालवण तालुक्यात जल जीवन मिशन योजनेअंतर्गत सुरु असलेल्या कामांची आढावा बैठक उद्या गुरुवार दि. ०८/०८/२०२४ रोजी सकाळी ११ वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग,ओरोस येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी कुडाळ मालवण तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेच्या प्रलंबित कामांबाबत लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या ज्या काही तक्रारी असतील त्यांनी आपल्या तक्रारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख यांच्या खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर लेखी स्वरूपात पाठवाव्यात. व सदर बैठकीस उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना प्रवक्ते मंदार केणी यांनी केले आहे.

-संपर्क –
कुडाळ तालुकाप्रमुख- राजन नाईक मोबा-९४२१२३५३००

मालवण तालुकाप्रमुख- हरी खोबरेकर
मोबा- ९४०४१६५२०९

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here