सावंतवाडी,दि.०१: आज भाजपा बांदा मंडलाचे उपाध्यक्ष उमेश पेडणेकर यांचा वाढदिवस भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या उपस्थितीत सावंतवाडी युवा मोर्चाच्या कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र राज्याची जबाबदारी असतानाही आपल्या भाजपा परिवारातील माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या वाढदिवसाची खास आठवण ठेवत वाढदिवसानिमित्त विशालभाईंनी दिलेल्या शुभेच्छा सदैव आठवणीत राहतील अशा भावना उमेश पेडणेकर यांनी व्यक्त केल्या.
भाजयुमो सावंतवाडी कार्यालयात भाजपा युवामोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी उमेश पेडणेकर यांना वाढदिवसाचा केक कापत शुभेच्छा दिल्या. मैत्रीचे नाते हेच माझ्या राजकीय वाटचालीचे सूत्र राहिले असून उमेश पेडणेकर याच्यासारखे पक्षासाठी रात्रंदिवस धडपडणारे निष्ठावान कार्यकर्ते हीच माझी खरी संपत्ती आहे. त्यांच्या उत्कर्ष, प्रगती आणि समाधानी आयुष्याची मी नेहमीच ईश्वराकडे प्रार्थना करेन अशा भावना यावेळी विशाल परब यांनी व्यक्त केली. “मैत्रीच्या नात्याची अशी एक ही पाठीवरती थाप हवी, विश्वासाच्या साथीवरती गाठू प्रगतीची शिखरे नवी” अशा मनमोकळ्या आणि हसतखेळत वातावरणात यावेळी हा छोटेखानी सोहळा संपन्न झाला. यावेळी वेत्ये ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र गावकर, इन्सुली बुथ अध्यक्ष अमेय कोठावळे, वेत्ये बुथ अध्यक्ष गोविंद गावडे, इन्सुली माजी ग्रा.पं. सदस्य प्रताप सावंत, महेंद्र सावंत, महेंद्र पालव, औदुंबर पालव, अभय आजगांवकर, दै. प्रहार प्रतिनिधी राजाराम धुरी आदी मान्यवर आणि युवा मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते.