शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा वाढदिवस चिपळुणात उत्साहात साजरा

0
22

चिपळूण,दि.२७: (ओंकार रेळेकर)शनिवार शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त चिपळूण शहारत विविध सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले होते. वाढदिवसानिमित्त चिपळूण शहरातील कन्या शाळा, पेठमाप शाळा, गोवळकोट शाळा, ओझरवाडी शाळा, रावतळे शाळा येथे खाऊ वाटप करण्यात आले.

तर सेतू बालक संगोपन केंद्र व आरती निराधार केंद्र यांना गॅस शेगडी भेट दिली.तसेच ओझरवाडी मराठी शाळेत वृक्ष बाबत महिती देण्यात आली.यावेळी शहरप्रमुख शशिकांत मोदी यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सर्व शाळांमध्ये महिती दिली. यावेळी महीला तालुका संघटक स्वाती देवळेकर, महीला शहर संघटक वैशाली शिंदे, युवासेना शहर प्रमूख पार्थ जागुष्टे, महीला उपशहर प्रमुख सौ. मानसी वरवडेकर , उपशहर प्रमुख संजय रेडीज, संतोष पवार, राजू विखारे, राजन खेडेकर,सुनिल कुलकर्णी, माजी नगरसेवक मनोज शिंदे, सुषमा कासेकर, संकेत शिंदे, उदय जुवळे, विशाल बेचावडे ,संदेश किंजलकर , दीपक ओकटे ,मनोज पांचाळ, आशिष कदम, आकाश कदम, राहुल गुरव, अथर्व चव्हाण,गणेश जाधव,शक्ती चव्हाण आदी उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here