दोडामार्ग येथे आयोजित रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
162

एकूण ३१ जणांनी केले रक्तदान.. सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान,औद्योगिक प्रशिक्षण संस्था दोडामार्ग यांचा स्तुत्य उपक्रम

दोडामार्ग, दि.५ : सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान-सिंधुदुर्ग शाखा दोडामार्ग व औद्योगिक प्रशिक्षण संस्था, दोडामार्ग यांच्या संयुक्त विद्यमाने दोडामार्ग येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ३१ जणांनी रक्तदान केले.
हे शिबिर लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटी व जी.एम.सी. गोवा यांच्या सहकार्याने व औद्योगिक प्रशिक्षण संस्था दोडामार्ग यांच्या पुढाकाराने यशस्वी झाले.

यावेळी व्यासपीठावर प्राचार्य आर.डी.जानवेकर, बँक मँनेजर विष्णू देसाई, जी.एम.सी. गोवा बल्ड बँक डाँ. पाशखल डिसोजा, दोडामार्ग-सावंतवाडी विभागीय अध्यक्ष संजय पिळणकर उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बरेच रुग्ण गोवा राज्यातील आरोग्य सेवेवर अवलंबून असून जी.एम.सी. गोवा येथे रक्ताचा पुरवठा होणाऱ्या वैद्यकीय सेवा येथे रक्ताची आवश्यकता असल्याने रक्तदान शिबिर आयोजित केले होते. यावेळी सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान कार्यात लोकमान्य बँक सदैव सहकार्य करेल अशी ग्वाही मँनेजर विष्णू देसाई यांनी दिली. तर प्राचार्य श्री.जानवेकर यांनी देश कार्यात आय.टी.आय. दोडामार्ग संस्थेचे कायमस्वरूपी योगदान राहील असे प्रतिपादन केले. रक्तांची आवश्यकता असताना सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे डॉ. डिसोजा यांनी कौतुक केले. तर रक्ताची आवश्यकता असताना दोडामार्ग तालुका शाखेने पहिले शिबिर आयोजित केल्याने विभागीय अध्यक्ष पिळणकर यांनी अभिनंदन केले. यावेळी कु.तनस्वी कैलास सावंत (दोडामार्ग ) कु.रुचिता दत्ताराम परब (कुंब्रल ) या युवतींनी पहिल्यांदा तर प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष सौ.गिंताजली सातार्डेकर यांनी चौथ्यांदा रक्तदान केले. सुत्रसंचालन भूषण सावंत यांनी तर आभारप्रदर्शन गितांजली सातार्डेकर यांनी व्यक्त केले. यावेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिक्षक के.एन.सोमनाथ, पी.डी.गुराखे, श्री.सावंत, श्री.चारी, श्री.कविटकर, बँक स्टाफ निखिल दळवी, संग्राम चव्हाण, प्रतिष्ठान चे वैभव रेडकर उपस्थित होते. यावेळी जी.एम.सी. गोवा तर्फे प्राचार्य श्री.जानवेकर व प्रतिष्ठान चे वैभव रेडकर यांना यशस्वी आयोजनाबद्दल डॉ. डिसोजा यांनी प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला. तर सर्व 31 रक्तदात्यांना सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग प्रशस्तीपत्र व जी.एम.सी. गोवा यांचे कार्ड देऊन सन्मान केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here