कुडाळ येथील समीर म्हाडेश्वर यांना सिंधुदुर्ग महाराष्ट्र पञकारिता, दशावतार सेवा पुरस्कार जाहीर

0
51

समृद्धी पब्लिकेशन व सम्यक सामाजिक संस्था, मुंबईचे आयोजन

सिंधुदुर्ग,दि.१५: समृद्धी पब्लिकेशन व सम्यक सामाजिक संस्था, मुंबई आयोजित राष्ट्रीय एकात्मता गौरव संमेलन, ठाणे – २०२४ ‌अंतर्गत समीर म्हाडेश्वर, रा.कुडाळ, माणगाव यांना सिंधुदुर्ग महाराष्ट्र पञकारिता, दशावतार सेवा पुरस्कार जाहीर झाला आहे.

हा पुरस्कार साहित्य, कला, सामाजिक, क्रिडा, सांस्कृतिक, उद्योग, पर्यटन, अपंग निराधार महिला, वन्यजीव अशा विविध क्षेत्रात उत्तुंग यश संपादन करून राष्ट्रहितासाठी गेली अनेक वर्षे अलौकिक कार्य करण्याची प्रेरणा व उदंड शक्ती समाजात कार्यरत असणाऱ्यांना दिला जातो. यावर्षी हा पुरस्कार ‌ समीर महाडेश्वर यांना जाहीर झाला आहे.

राष्ट्रीय एकात्मता गौरव संमेलनात मा. श्री. मिलिंद गवळी (सुप्रसिद्ध सिने अभिनेते), श्री. मेघराज राजेभोसले, (अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ) व मा. जाकीर खान, (चित्रपट अभिनेते) यांच्या शुभहस्ते रविवार दि. २१ जुलै २०२४ रोजी स. १०.३० वाजता, स्थळ मराठी ग्रंथ संग्रहालय पहिला मजला, ना.अ. रेगे सभागृह, जिल्हा परिषदेसमोर स्टेशन रोड, ठाणे (प). येथे सन्मानित करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here