सावंतवाडीत राजे प्रतिष्ठानच्या विविध पुरस्कारांचे भाजप युवा नेते विशाल परब यांच्या शुभहस्ते वितरण
सावंतवाडी,दि.१४: छत्रपतींच्या सेवाआदर्शांचा सावंतवाडीकरांच्या मनात असलेला नितांत आदर यापुढेही सदैव अखंड राहील, असे प्रतिपादन यावेळी भाजपा युवामोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी सावंतवाडीत राजे प्रतिष्ठान सिल्लोड च्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रम वेळी मत व्यक्त केले.
श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले महाराज संस्थापक राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र राज्य या संघटनेचा विविध पुरस्कार वितरण सोहळा आज सावंतवाडी कार्यालयात उत्साहात संपन्न झाला. भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिंधुदुर्ग तर्फे देण्यात येणाऱ्या यावर्षीच्या विविध पुरस्कार वितरण आणि सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम आज राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिंधुदुर्गचे प्रधान कार्यालय न्यू सबनीसवाडा सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आला होता.
यावेळी आदर्श शिक्षक पुरस्कार व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. आदर्श शिक्षक पुरस्कार सोनाली बांदेलकर, कळसुलकर हायस्कूल सावंतवाडी यांना मानपत्रासह अर्पण करण्यात आला. राजे प्रतिष्ठान सिंधुदूर्ग सल्लागार नारायण सावंत या सावंतवाडीच्या सुपुत्राची भाजप कामगार मोर्चाच्या प्रदेश सचिवपदी निवड झाल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले. जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर यांना कोल्हापूर येथे २०२४ चा लोकराजा राजर्षी शाहू महाराज गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यक्रमाचे उद्घाटन व होतकरू विद्यार्थ्यांसाठी शालोपयोगी वस्तूंचे वाटप कार्यक्रमही यावेळी घेण्यात आला. जनसेवा पुरस्कार सावंतवाडी राष्ट्रीय संघटना सल्लागार शाम सावंत. कुडाळ तालुकाध्य अनघा रांगणेकर जनसेवा पुरस्कार समाजात आदर्शवत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची आठवण ठेवत त्यांना सन्मानित करण्याचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून त्यानिमित्ताने छत्रपती शिवरायांच्या सेवा आदर्शाची प्रेरणा सर्वांच्या मनात पुन्हा जागृत झाली आहे. असे मत भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी या कार्यक्रमांमध्ये मत व्यक्त केले.
यावेळी या कार्यक्रम वेळी युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्यासमवेत ॲड.अनिल निरवडेकर, सावंतवाडी नगरपालिकेचे माजी नगरसेवक सुधीर आडिवरेकर, दिलीप भालेकर, राजे प्रतिष्ठानचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर,उपाध्यक्ष मंगेश माणगावकर,सचिव रामचंद्र कुडाळकर.जिल्हा खजिनदार ज्ञानेश्वर पारधी,जिल्हा संपर्कप्रमुख शिवा गावडे, महिला जिल्हा अध्यक्ष पुजा गावडे, शाम सावंत,राजे प्रतिष्ठानचे सावंतवाडी तालुका प्रमुख संजय गावडे, तालुका महिला अध्यक्षा संचिता गावडे,तालुका संघटक आनंद सोनसुरकर,रेवती मुननकर सरिता भिसे, मनीषा गावडे, सायली गावडे,मनीषा गावडे समिक्षा मोघे,प्रा केशव जाधव, सुभाष गावडे, प्रणिता सावंत , अर्पिता गावडे, दर्शना राणे, अपंग संघटनेचे महेंद्र चव्हाण, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केशव जाधव यांनी केले.