सावंतवाडी,दि.२४: तालुक्यातील कारिवडे डंगवाडी येथील पहिली ते बारावी च्या विद्यार्थ्यांना रविवारी डंगवाडी युवक मंडळ व गडवाट संस्थेच्या संयुक्त उपक्रमातून डंगवाडीतील एकूण २४ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
मुलांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी व गरजू विद्यार्थ्यांना एक मदतीचा हात म्हणून आणि आपण समाजाचे काही देणे लागतो ह्या एका उदात्त हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे येथील युवकांनी सांगितले.
दरम्यान युवकांनी राबविलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.