पुलं अल्पावधीतच सुरू झाल्याने ग्रामस्थांनी व्यक्त केले समाधान
चिपळूण,दि.१७: (ओंकार रेळेकर)पालशेत गावात नवा पूल झाल्याने श्रीमती रखुमाई पांडुरंग पालशेतकर कनिष्ठ विद्यालयच्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय दूर झाली असून पावसाळ्यामध्ये होणाऱ्या त्रासापासून मुलांची सुटका झाली आहे. याबद्दल रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य तथा श्रीमती रखुमाई पांडुरंग पालशेतकर कनिष्ठ विद्यालया चे प्रमुख उद्योजक प्रशांत पालशेतकर यांनी सार्वजनिक बांधकाम खाते व संबंधित ठेकेदार, पालशेत ग्रामपंचायत आणि उपसरपंच पंकज बिर्जे या सर्वांचे विशेष आभार मानले आहेत या पुलामुळे पालशेत गावांमध्ये जणू प्रगतीचा नवा मार्गच सुरू झाल्याची प्रतिक्रिया प्रशांत पालशेतकर यांनी येथे बोलताना दिली.
तालुक्यातील गुहागर –
पालशेत मार्गावरच्या पुलाचे काम अल्पावधीतच मार्गी लावण्याची किमया चिपळुणातील प्रसिध्द ठेकेदार सुरेश चिपळूणकर यांनी केले आहे. यामुळे पावसाळ्यात ग्रामस्थ, वाहनधारकांची होणारी गैरसोय टळली आहे. याबाबत कृतज्ञता व्यक्त करीत ग्रामस्थांनी ठेकेदार चिपळूणकर यांचा सन्मान केला.
पालशेत येथील पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात या पुलावरची वाहतूक ठप्प होत होती. त्याचा फटका वाढवून वाहनधारकांसह स्थानिक ग्रामस्थांना बसत होता. त्यामुळे या पुलाची उंची नव्याने पूल उभारण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याची दखल घेत ५ कोटी रूपयांच्या निधीतून या पुलाच्या उभारणीचे काम हाती घेतले होते. या कामाचा ठेका एस. एम. चिपळूणकर या कंपनीला देण्यात आला होता. या कामाचे भूमिपूजन
भास्कर जाधव यांच्या हस्ते झाले होते.पावसाळा तोंडावर असल्याने ठेकेदार सुरेश चिपळूणकर यांच्यासमोर पूल उभारण्याचे मोठे आव्हान होते. पूल खाडी पात्रात असल्यामुळे भरती-ओहटीमुळे कामात अडचणी येत होत्या. मात्र या ठिकाणी आवश्यक साहित्य, मनुष्यबळ, मशनरी
तैनात करीत अल्पावधीतच हा देखणा व दर्जेदार पूल उभा केला. या पुलामुळे पावसाळ्यात निर्माण होणारी ग्रामस्थांची अडचण आता टळली आहे. उपसरपंच पंकज बिर्जे यांनी पुलाचे पूजन करुन पहिली गाडी सोडली. यामुळे ग्रामस्थांनी ठेकेदार सुरेश चिपळूणकर यांचा सन्मान करीत गावामार्फत आभार व्यक्त केले.
या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रामसे, उपअभियंता निकम, उपसरपंच पंकज बिर्जे, कंपनीचे इंजिनिअर सुनिल मेस्त्री,निलेश विखारे, हरेश पटेकर, महेश तोडणकर, विकास पाटील, योगेश हळये, मंगेश तोडणकर, राजू गुहागरकर, विवेक तोडणकर, माधव सुर्वे, संदीप वजरेकर, साईड सुपरव्हायझर नारायण पवार आदी अधिकारी, पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.