सावंतवाडी,दि.२८: येथील रोणापाल भरडवाडी तसेच खेरकटवाडी मधील लोकांना आपल्या मुलभूत गरजा भागविण्यासाठी रस्ता नसल्याने अबाल वृद्ध, गरोदर महिला, शाळेतील विद्यार्थी लहान मुले, शेतकरी यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
एका पक्षाचा पदाधिकारीच खेरकटवाडी मधून भरडवाडीकडे जाणारा पूर्वांपार वापरातील रस्त्या न होणेसाठी प्रयत्न करत असून, स्वत:च्या मर्जीनुसार रस्त्यावर अतिक्रमण करणे व पुन्हा ते काढून टाकून रस्ता पूर्ववत करणे असे वारंवार घडत असून नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे आगामी ०७ मे ला होणाऱ्या लोकसभा निवडणुकींमध्ये तसेच येणाऱ्या सर्व निवडणूकांच्या मतदानावर रस्ताचा प्रश्न कायमस्वरूपी न मिटल्यास भरडवाडी मधील जवळपास १०० मतदारांनी पुर्णपणे बहिष्कार घालण्याचे ठरविले आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे होऊन सुद्धा वाडीवर जायला रस्ता नसेल तर आम्ही का म्हणून मतदान करायचे असा सवालही येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे.