संगमेश्वर येथील अस्थिरुग्ण तपासणी व उपचार शिबिरात ५५० रुग्णांनी घेतला लाभ

0
33

चिपळूण,दि.२४: वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स आयोजित संगमेश्वर येथील अस्थिरुग्ण तपासणी उपचार शिबिरात संगमेश्वर-देवरुख येथील ५५० अस्थिरुग्णांनी लाभ घेतला. या शिबिराचे संगमेश्वर-देवरुखवासीयांनी समाधान व्यक्त केले आहे. तर चिपळूण मधील उद्याच्या शिबिरासाठी ४५० रुग्णांनी नोंदणी केली असून अजूनही नोंदणी सुरूच असल्याची माहिती वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सच्या मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांनी दिली.

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात प्रशांत यादव मित्र मंडळ तर्फे तर यावर्षी वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सतर्फे अस्थि रुग्ण तपासणी उपचार शिबिर संगमेश्वर- देवरुखवासीयांसाठी संगमेश्वर येथे दिनांक २२ व दिनांक २३ रोजी आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला माजी मंत्री रवींद्र माने,नेहा माने,काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, युयुत्यु आर्ते, सचिन देसाई,संतोष थेराडे, केशवराव इंदुलकर, कमलाकर देसाई,दिलीप सावंत,निखिल कोलवणकर, सुरेश सप्रे, बंड्या महाडिक, विश्वास फडके ,प्रभाकर तांबे,अरविंद जाधव, कृष्णा हरेकर यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी सदिच्छा भेट देत या शिबिराच्या नियोजनाबद्दल कौतुक केले.तसेच या शिबिराला चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, संचालिका सौ. स्मिता चव्हाण, अशोक साबळे, राजेंद्र पटवर्धन, प्रमोद साळवी,प्रकाश साळवी,प्रकाश पत्की, सत्यवान म्हामूनकार, सोमा गुडेकर यांच्यासह संचालक मंडळ, तर वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत यादव आदी उपस्थित होते.या शिबिराच्या दोन दिवसाच्या कालावधीत संगमेश्वर -देवरुख येथील ५५० अस्थिरुग्णांनी लाभ घेतला. यावेळी जोधपूर येथील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. नंदकिशोर पाराशर, डॉ. हेमंत कुमार पाराशर, डॉ. निखिल पाराशर, डॉ. राकेश पाराशर यांनी रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन केले.काही रुग्णांना तपासणी व उपचारानंतर तात्काळ आराम मिळाल्याने समाधान व्यक्त केले. संगमेश्वर- देवरुखवासीयांनी पुढील वर्षी देखील या शिबिराचे आयोजन करावे, असे मत यावेळी आयोजकांशी व्यक्त केले. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत यादव, मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहकाऱ्यांनी मेहनत घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here