“हरे कृष्ण” संस्कार केंद्र, सावंतवाडी येथे तीन दिवसीय रामकथेला आजपासून प्रारंभ..

0
71

सावंतवाडी,दि.१५: आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन सावंतवाडी च्या वतीने आयोजित केलेल्या रामकथेचा प्रारंभ आज सावंतवाडी चे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला.
संस्थेच्या वतीने प्रत्येक वर्षी रामकथे आयोजन करण्यात येते या वर्षी लोकनाथ स्वामी महाराज यांचे शिष्य श्रीमान कृष्ण नाम प्रभुजी रामकथा करणे साठी लाभले आहेत.स्व:ता कृष्ण नाम प्रभुजी उच्च शिक्षित आहेत त्याच बरोबर त्यांनी आध्यात्मिक शास्त्रात भक्तीशास्त्री ही पदवी मिळवली आहे.
रामायणातील बंधु प्रेम (भरत मीलन)या विषयावर राम कथा रामनवमी पर्यंत चालू राहील.
दरम्याम रोज भजन,कीर्तन,प्रवचन, आरती, महाप्रसाद, असा भक्तीमय वातावरणात सोहळा साजरा केला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here