सावंतवाडी,दि.०४: येथील राजा शिवाजी चौक मित्र मंडळ सावंतवाडी यांच्यावतीने मराठी नववर्ष स्वागताच्या निमित्ताने दिनांक ९ एप्रिल २०२४ रोजी
भव्य ग्रुप रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
दरवर्षी गुढीपाडव्यानिमित्त श्री सत्यनारायणाची महापूजा असते या कार्यक्रमाच्या निमित्ताने ही स्पर्धा ठेवण्यात आली आहे.
ही स्पर्धा दोन गटांमध्ये होणार आहे एक बालगट आणि दुसरा खुला गट, खुल्या गटासाठी प्रथम पारितोषिक ८००० हजार रुपये, द्वितीय पारितोषिक ५००० रुपये, तृतीय पारितोषिक ३००० रुपये, तर बालगटासाठी प्रथम पारितोषिक ५००० हजार रुपये,द्वितीय ३००० हजार तृतीय २००० हजार असे स्पर्धेचे स्वरूप असणार आहे. स्पर्धेमध्ये परीक्षकांचे निर्णय अंतिम राहतील. ही स्पर्धा ठीक साडेसहा वाजता सुरू करण्यात येणार आहे याची प्रत्येक स्पर्धकांनी दिनांक ८ एप्रिल संध्याकाळपर्यंत मंडळांच्या कार्यकर्त्यांकडे नोंद द्यायची आहे. स्पर्धकांनी वेळेत उपस्थित राहावे स्पर्धकांनी आपली नाव नोंदणी करिता दीपक सावंत : 724920 2691 दिलीप पवार : 9405163107 व रवी जाधव 9405264027 या नंबर वरती संपर्क साधायचा आहे. स्पर्धे दिवशी आयत्यावेळी आलेल्या स्पर्धकांना स्पर्धेमध्ये भाग घेता येणार नाही. स्पर्धकांनी आपली नोंदणी आगाऊ करावी. त्याच दिवशी स्पर्धा संपल्यानंतर बक्षीस वितरण होणार आहे. असे मंडळाचे अध्यक्ष बंटी माठेकर, उपाध्यक्ष बंड्या तोरस्कर, उपाध्यक्ष दिलीप पवार, उपाध्यक्ष अरुण घाडी, सचिव दीपक सावंत, सचिव महादेव राऊळ जनसंपर्कप्रमुख रवी जाधव यांच्या वतीने आवाहन करण्यात आलेला आहे.
Home ठळक घडामोडी राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त भव्य ग्रुप रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे...