यवतमाळ येथे सहाय्यक सहकार अधिकारी पदावर नियुक्ती
सावंतवाडी,दि.०६: येथील भाईसाहेब सावंत हायस्कूल माजगाव सावंतवाडी येथील कर्मचारी कै. भरतराव व्यंकटराव कुटेमाटे यांची ज्येष्ठ कन्या कु.चैताली भरतराव कुटेमाटे यांची उपनिबंधक सहकारी संस्था यवतमाळ येथे सहाय्यक सहकार अधिकारी ह्या पदावर स्पर्धा परीक्षे मधून खुल्या प्रवर्गातून गुणवत्तेवर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे माजगांव पंचक्रोशी मध्ये सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. कु. चैताली हि लहानपणा पासून मेहनती व होतकरू हुशार विद्यार्थी होती. कु चैताली हि भाईसाहेब सावंत हायस्कूल माजगाव विद्यार्थिनी असून तिने सावर्डे शिक्षण संस्थेतुन बी एस.सी.एंँग्री ( B. Sc. Agree ) मधून पदवी शिक्षण पुर्ण केले. शिक्षण होताच तिने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरु केला. सदर कालावधीत तिच्या वडिलांचे आकस्मित निधन झाले. वडिलांचे निधन झाल्यावर खचुन न जाता आपल्या आईची व बहिणी तसेच संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन पुन्हा चैताली हिने जोमाने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. सहकार विभागा मार्फत सप्टेंबर २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत ती खुल्या प्रवर्गातून गुवात्तेवर सदर परीक्षा उत्तीर्ण झाली. तिच्या या यशाचे संपूर्ण माजगाव व सावंतवाडी येथे कौतुक करण्यात येत आहे.