शिवसेना उपशहर प्रमुख सुयोग चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत चष्मे वाटप कार्यक्रम संपन्न १९० नागरिकांनी घेतला लाभ
चिपळूण,दि.२८ : विविध सणवार आणि वाढदिवसाचे औचित्य साधून सुयोग चव्हाण आणि माजी नगरसेविका सई चव्हाण हे दाम्पत्य पाग परिसरामध्ये उत्कृष्ट असे सामाजिक उपक्रम राबवून उत्तम जनसेवा करीत आहेत. आज सुयोग चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त येथील नागरिकांना चष्मा वाटप करून एक चांगली दृष्टी देण्याचे काम सुयोग चव्हाण आणि मित्रपरिवार करीत आहेत. सुयोग चव्हाण यांचे सामाजिक कार्य खरोखरच उल्लेखनीय आहे अशी प्रतिक्रिया चिपळूणच्या माजी सभापती सौ .पूजा शेखर निकम यांनी येथे बोलताना व्यक्त केली.
पाग येथील शिवसेना उपशहर प्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते सुयोग चव्हाण यांच्या ४४ व्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी पाग मराठी शाळा येथे प्रभागातील नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी आणि चष्मे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.माजी आमदार सदानंद चव्हाण, सीमाताई चव्हाण, उद्योजक प्रशांत यादव, उमेश सकपाळ, दशरथ दाभोळकर आदी मान्यवर मंडळींनी चव्हाण यांना येथे उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून माजी सभापती सौ. पूजाताई निकम उपस्थित होत्या त्यांनी आपल्या भाषणात या उपक्रमाचे कौतुक केले. सकाळी १० वाजता मोफत चष्मे वाटप कार्यक्रमाचे उद्घाटन सौ.निकम यांच्या हस्ते संपन्न झाले. पाग मराठी शाळेचे मुख्याध्यापक श्री .मोरे सौ. पूजा धुरी यांनी या कार्यक्रमाकरिता शाळा उपलब्ध करून दिल्याबद्दल सुयोग चव्हाण यांनी त्यांचे आभार मानले. मोफत चष्मे वाटप कार्यक्रमांतर्गत मंगळवारी दिवसभर तपासणी करून १९० नागरिकांना चष्मे देण्यात आले तर एकूण ३० नागरिकांना मोफत आधार काठी देण्यात आली या संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे नियोजन सुयोग चव्हाण मित्र मंडळाने केले होते.विश्व हिंदू परिषद जिल्हा मंत्री उदय चितळे, उदय सलागरे,रवी ठसाळे, राम पाटकर ,प्रसाद शिंदे ,उदय चितळे, दिलीप आंब्रे, माजी नगरसेविका सई चव्हाण, सुयोग चव्हाण, विपुल कांबळी, रोहित बोंडकर, शुभम बोडकर, सागर बोडकर, सुमित चव्हाण, शार्दुल चव्हाण, नयन चव्हाण, अमित दळवी, पप्पू गोरीवले, ऋषभ तांबडे, आशुतोष गोरीवले, ओंकार जाधव ,महेश शिंदे ,प्रकाश मिरगल, नैनेश तांबडे, बाबू गोरीवले, जगदीश गोरीवले, अजित सावंत, सुरेश तटकरी, सोहम चव्हाण पाग मराठी शाळा मुख्याध्यापक श्री. मोरे ,सौ.पूजा धुरी आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.