सावंतवाडी,दि.२७: येथील सुप्रसिद्ध निवेदक, शिवशंभू व्याख्याते तथा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा. रूपेश पाटील यांची भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच, सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मल्लसम्राट प्रतिष्ठानकडून हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
प्रा. रूपेश पाटील यांचे साहित्य, कला, सामाजिक, शैक्षणिक तथा सांस्कृतिक क्षेत्रातील कामाची आवड पाहून, साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील विविध समस्या सोडविण्याबाबत वेळोवेळी दिलेल्या योगदानाबद्दल तसेच त्यांनी राजविलेले विविध उपक्रमांची दखल घेत त्यांची भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच या राष्ट्रीय संघटनेच्या ‘सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष’ पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसे त्यांना निवडीचे पत्र संस्थापक अध्यक्ष विशाल नामदेव सिरसट, संस्थापक उपाध्यक्ष विजय विष्णू जायभाये, शिल्पा श्रीकांत मुसळे (राष्ट्रीय कार्याध्यक्षा), चैताली कापसे (महिलाध्यक्षा), छाया देसले (कोषाध्यक्षा), योगेश हरणे (सहसचिव), वैशाली पडवळ (कोकण प्रदेश कार्याध्यक्षा), सिद्धार्थ सुर्वे (कोकण प्रदेश उपाध्यक्ष) यांनी पाठविले असून भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच संघटनेने त्यांचे अभिनंदनही केले आहे.
दरम्यान प्रा. रुपेश पाटील यांच्या या स्तुत्य निवडीबद्दल मल्लसम्राट प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांच्यावतीने हार्दिक अभिनंदन व सत्कार करण्यात आला. यावेळी मलासम्राट प्रतिष्ठानचे अध्यक्ष जावेद शेख,
सेक्रेटरी ललित हरमलकर, खजिनदार गौरव कुडाळकर तसेच ज्येष्ठ कलावंत रामदास पारकर, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, राजू तावडे तसेच मल्लसम्राट प्रतिष्ठानचे सदस्य दादू हरमलकर, दशरथ गोंद्याळकर, नागेश सूर्यवंशी, किशोर हरमलकर, देवेश पालव, योगेश रावल, कुणाल परब, फिझा मकानदार, कामाक्षी महालकर आदी उपस्थित होते.