सावंतवाडी उभाबाजार येथे आयोजन: स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद
सावंतवाडी,दि.२०: येथील उभाबाजार बाल गोपाल मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या खेळ पैठणीचा या स्पर्धेमध्ये योगिता टिळवे या पैठणीची मानकरी ठरल्या तर उपविजेत्या सिध्दी निंबाळकर या ठरल्या, तृतीय क्रमांक पल्लवी टोपले, यांनी चौथा क्रमांक विधाता पोकळे, तर पाचवा क्रमांक योगिता पांगम यांनी पटकावला.
सावंतवाडी उभाबाजार येथे शिवजंयती च्या पाश्र्वभूमीवर रविवारी सायंकाळी बाल गोपाल मित्र मंडळ यांच्या वतीने खेळ पैठणीचा तसेच लहान मुलांचे विविध खेळ आयोजित करण्यात आले होते.
या खेळ पैठणीच्या कार्यक्रमा चे उद्घाटन अध्यक्ष रघुनाथ कोरगावकर माजी नगराध्यक्ष श्वेता शिरोडकर याच्या उपस्थितीत निवडणूक नायब तहसिलदार लता वाडकर महिला काँग्रेस अध्यक्षा साक्षी वंजारी अॅड सायली दुभाषी यशवंत कोरगावकर अरूण भिसे प्रशांत वाळके अनिल भिसे यांच्या उपस्थितीत पार पडले.
यावेळी सुत्रसंचालन शुभम धुरी यांनी केले त्यांनी विविध प्रश्न मंजुषा च्या माध्यमातून या खेळ पैठणी मध्ये रंगत आणली या स्पर्धेसाठी विविध खेळ आयोजित करण्यात आले होते.
त्यातून गुण मिळवून पैठणीची मानकरी ठरण्यात आली यात मोठ्याप्रमाणात स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.यातून पाच मानकरी काढण्यात आले त्यात योगिता टिळवे या पैठणीच्या मानकरी ठरल्या तर उपविजेत्या सिध्दी निंबाळकर या ठरल्या तृतीय क्रमांक पल्लवी टोपले यांनी चौथा क्रमांक विधाता पोकळे तर पाचवा क्रमांक योगिता पांगम यांनी पटकावला आहे. या सर्वाना कृतिका कोरगावकर यांच्या वतीने पैठणी पुरस्कृत करण्यात आल्या होत्या.ती पैठणी माजी नगराध्यक्ष श्वेता शिरोडकर याच्या उपस्थितीत घालण्यात आली.
यावेळी लता वाडकर सुरेखा रांगणेकर दुलारी रांगणेकर कृतिका कोरगावकर किरण हळदणकर यशवंत कोरगावकर समीर वंजारी सलील वंजारी बाळू कासार काशीनाथ दुभाषी कपिल कोरगावकर जतिन भिसे बेटा नार्वेकर सोहम वंजारी पूजा वाळके नविना वाळके मृणाल मसुरकर आरती टोपले विकी कारेकर संजय कारेकर गौरव कारेकर नितीन कारेकर उपस्थितीत होते.