सिंधुदुर्ग,दि.१५: जिल्हा परिषद सिंधुदुर्ग महिला व बाल विकास विभाग मार्फत “लेक लाडकी” ही महत्त्वाची योजना एक (१) एप्रिल २०२३ नंतर जन्माला येणाऱ्या मुलगी अपत्यासाठी लागू केलेली आहे.
योजना पात्रता निकषांमध्ये पालकांचे वार्षिक उत्पन्न एक (१) लाख मर्यादित असेल, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड धारक, व महाराष्ट्र राज्यात आदिवासी असलेल्या कुटुंबात जन्माला येणाऱ्या मुलींना ही योजना लागू आहे.
लाभार्थी : दोन अपत्या पर्यंत ची मुलगी/मुली अपत्ये (दुसऱ्या खेपेस जुळी अपत्ये झाल्यास त्यातील मुलगी/ मुली)
*लाभाचे स्वरूप :१)* मुलीचा जन्म झाला : पाच हजार (५०००) रुपये
*२)* मुलगी पहिलीत गेल्यास सहा हजार रुपये (६०००)
*३)* मुलगी सहावीत गेल्यास सात हजार रुपये (७०००)
*४)* मुलगी अकरावीत गेल्यास आठ हजार रुपये (८०००)
*५)* मुलीचे अठरा (१८) वर्ष पूर्ण झाल्यानंतर व अविवाहित असताना ७५ हजार रुपये असे एकूण एक (१) लाख एक हजार रुपये.
या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना मिळणार आहेत.
यासाठी आपल्या जवळील अंगणवाडी येथे याबाबतचे अर्ज मिळणार आहेत.