…तर दोघे जण किरकोळ जखमी.. सावंतवाडी शहरातील घटना
सावंतवाडी,दि.१४: शहरातील जिमखाना मैदाना समोर निवासी संकुलाचे काम सुरू असून या कामासाठी स्वार हाॅस्पीटल च्या बाजूच्या संरक्षक भिंतीची माती काढत असताना अचानक तिघांवर मातीचा ढिगारा कोसळला यात दोघांना वाचविण्यात यश आले तर शारूबाई गोविंद राठोड (32) ही महिला मात्र ढिगार्याखाली अडकल्याने ती जागीच मृत पावली ही घटना बुधवारी सायंकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास घडली.
यातील जखमींना येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोघांची ही प्रकृती स्थिर असल्याचे रूग्णालया कडून सांगण्यात आले.
सावंतवाडी शहरातील जिमखाना मैदाना समोर एका निवासी संकुलाचे काम सुरू आहे.या कामासाठी स्वार हाॅस्पीटल च्या बाजूच्या भितीची असलेली माती काढण्यात येत होती.त्याच वेळी तिथे काहि कामगार काम करत होते.तेवढ्यात स्वार हाॅस्पीटल च्या बाजूच्या भितीचा ढिगारा खाली आला त्याच वेळी तेथे काम करीत असलेल्या शारूबाई गोविंद राठोड (32) गोविंद राठोड (36) चादूबाई दीपक जाधव (33) या तिघांवर हा ढिगारा कोसळला.
मात्र यातून गोविंद राठोड व चादूबाई जाधव या दोघांनी आपला प्राण कसाबसा वाचवला पण ते किरकोळ जखमी झाले आहेत.त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र शारूबाई च्या अंगावर च सर्व माती व दगड आल्याने ती ढिगाऱ्याखाली गेली त्यानंतर तेथील कामगारांनी धावाधाव करून नागरिकांना बोलवले तसेच पोलिसांना माहिती दिली त्यानंतर जेसीबी च्या साह्याने ढिगारा बाजूला करण्यात आला व त्यानंतर शारूबाई हिचा मृतदेह बाहेर काढून रूग्णालयात हलविण्यात आला.
या अचानक घडलेल्या घटनेने शारूबाई च्या सहकार्याना अश्रू आवरणे कठीण झाले होते.महिलांनी तर एकच टाहो फोडला होता.शारूबाई ही पतीसह या इमारती च्या कामाला होती.तिला दोन मुली असून त्यातील एक गावी तर एक सावंतवाडीत असते.