सावंतवाडी नगरपरिषदेचे आयोजन..
सावंतवाडी,दि.१२: येथील पाळणे कोंड धरणावरील श्री सिद्धिविनायक गणेश मंदिरा मध्ये उद्या मंगळवार १३ रोजी माघी गणेश जयंती उत्सव साजरा होणारा आहे. सिद्धिविनायक गणपतीची सकाळी आठ वाजल्यापासून धार्मिक कार्यक्रम, ठीक बारा वाजता गणेश जन्मोत्सव यानंतर आरती महाप्रसाद असे कार्यक्रमाची नियोजन नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे. तरी भाविकांनी महाप्रसाद तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन सावंतवाडी नगरपरिषद प्रशास, व माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.