रोटरीच्या मोफत पुर्व फिजीओथेरपी तपासणी शिबिराचे रविवारी सावंतवाडीत आयोजन

0
69

सावंतवाडी,दि.१०: सावंतवाडी रोटरी क्लब ऑफ,सावंतवाडी तालुका पत्रकार संघ, ज्येष्ठ नागरीक संघ आणि दिव्यांग विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने
रविवार ११ फेब्रुवारीला सकाळी ९.३०वाजता
मोफत पुर्व फिजीओथेरपी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे
रोटरी ट्रस्ट सेंटर, साधले मेस समोर, खासकीलवाडा, राजवड्यानजीक, सावंतवाडी.येथे
फिजीओथेरपी सेंटर सुरू करण्यात आले आहे या शिबिरात B.P.T. बॅचलर ऑफ फिजीओथेरपी डॉ. एंजेला रॉड्रीक्स व प्रसिद्ध अस्थी रोग तज्ञ
डॉ. रेवण खटावकर M.B.B.S. D. Ortho.हे तपासणी करणार आहेत.या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी राज्याचे
शालेय शिक्षण मंत्री व मराठी भाषा मंत्री रोटरी चॅरीटेबल ट्रस्ट चेअरमन ना.दिपकभाई केसरकर यांची उपस्थिती असणार आहे
या शिबिरात मानदुखी, सांधेदुखी, जुनी सांधेदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी, टेनिस एल्बो, स्नायुदुखी, लचकदुखी, फॅक्चर, पॅरालीसीस, सेरेब्रल प्लासी, स्पॉन्डीलॉसीसवर तपासणी व उपचार केले जाणार आहे.
तरी या कार्यक्रमास मोफत तपासणी व उपचार पद्धतीचा लाभ घेण्याचे आवाहन रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीचे अध्यक्ष सुहास सातोसकर,सचिव प्रवीण परब पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार,सचिव मयूर चराठकर
यांनी केले आहे.
नोंदणीसाठी रो. साई हवालदार 7721803737
रो. आनंद रासम 9356785028 यांच्याशी संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here