बांदा पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी घेतली नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडवे यांची भेट

0
91

सावंतवाडी,दि.०२: येथील बांदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शामराव काळे यांची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभारी अधिकारी सागरी सुरक्षा सिधुदुर्ग या पदी बदली झाल्याने त्यांच्या जागी अप्पर पोलीस अधिक्षक यांचे वाचक म्हणून काम पहाणाऱ्या विकास बडवे यांची बांदा पोलिस ठाण्याचे नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
दरम्यान आज बांदा येथील सामाजिक कार्यकर्ते गुरु कल्याणकर,बांदा ग्रा. पं. सदस्य प्रशांत बांदेकर, कास सरपंच प्रविण पंडित, निगुडे माजी सरपंच समीर गावडे, डिंगणे सरपंच संजय डिंगणेकर, निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे, रोणापाल ग्रा. पं सदस्य योगेश केणी यांनी सदिच्छा भेट घेतली.
यावेळी बांदा पंचक्रोशीतील समस्यां व सलोखा राखण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी श्री बडवे यांनी ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींच्या अडचणी,समस्या व प्रश्न जाणुन घेतले. तसेच याबाबत आपले नेहमीच सर्वतोपरी सहकार्य लाभेल असे सांगितले. आम्ही आपल्या सेवेसाठीच असुन, सर्वाच्या सहकार्याने पंचक्रोशीत कायदा व सुव्यवस्था राखण्यात येईल व सर्व प्रकारच्या गैरकृत्यांना आळा घातला जाईल असे आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here