सावंतवाडी,दि.१७: येथील डॉ. परूळेकर नर्सिंग होम येथे मुंबई येथील सामंत ट्रस्ट तर्फे गरजू व्यक्तींना धनादेश प्रदान करण्यात आले.
बांदा येथील निराधार असलेल्या भूमिका पाटील, कर्करोग पिडित ओंकार सावंत,इश्वरी म्हावळणकर या विद्यार्थ्यांनीला शिक्षणासाठी, किडनी आजाराने त्रस्त असलेल्या कोलगाव येथील प्रियांका दळवी, अर्धांगवायूने त्रस्त असलेल्या माणगाव येथील विशाल केसरकर,कुडाळ येथील मंगला खानोलकर यांना शस्त्रक्रियेसाठी आणि सावंतवाडी येथील गोविंद चव्हाण अशा सात गरजू लाभार्थ्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचे धनादेश डॉ जयेंद्र परुळेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.