सुनिल करडे व गणेश नाईक यांच्या नवोपक्रमाची राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी निवड

0
94

सिंधुदुर्ग,दि.१३: सन २०२३-२४ च्या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत जिल्हास्तर टप्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोलगाव नं ४ चे शिक्षक सुनिल करडे यांनी सादर केलेल्या नवोपक्रमाला प्रथम क्रमांक व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेंडूर खरारे शाळेचे शिक्षक गणेश नाईक यांच्या नवोपक्रमाला तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे. त्यांची राज्यस्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. नवोपक्रम राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरल्याने त्यांच्यावर शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
‘चुकत चुकत इंग्रजी शिकूया कृतियुक्त आनंदायी शिक्षणासंगे’ असा सुनिल करडे यांचा नवोपक्रम होता तर गणेश नाईक यांचा ‘वाचू आनंदे’ हा नवोपक्रम होता. दोघांचेही नवोपक्रम राज्यस्तरावरील स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
नवोपक्रमशील शिक्षक व अधिकारी यांच्या कल्पकतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्यामार्फत राज्यस्तरीय नवोपक्रम
स्पर्धेचे आयोजन केले जाते. ही स्पंर्धा विविध पाच गटात घेण्यात येते. त्याच्यामध्ये पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक,विषय सहाय्यक व विषय साधन व्यक्ती व अध्यापकाचार्य, पर्यवेक्षीय अधिकारी या गटांचा समावेश आहे. सदर स्पर्धेतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावरील टप्प्याचे आयोजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग यांच्यामार्फत करण्यात आले होते. त्यांच्या या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्गचे प्राचार्य सुशील शिवलकर, डॉ. लवू आचरेकर, शाळा मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सहकारी शिक्षक, पालक, विद्यार्थी व शिक्षण प्रेमी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here