सावंतवाडी,दि.११: तालुक्यातील माडखोल धवडकी येथील चिले मैदान येथे भाजप पुरस्कृत कमळ चषक क्रिकेट स्पर्धेचे दिनांक १२ ते १४ जानेवारी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे.
याबाबतची माहिती माडखोल धवडकी येथील सामाजिक कार्यकर्ते अमित राऊळ यांनी दिली.
यामध्ये एक गाव एक संघ सहभाग घेऊ शकतो.या स्पर्धेत विजेत्या संघाला ३० हजार व चषक,उपविजेत्या संघाला २० हजार व चषक तसेच खास आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.
तरी सर्व संघ मालकांनी आपला संघ घेऊन उद्या शुक्रवार दिनांक १२ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता माडखोल येथील चिले मैदान येथे उपस्थित रहावे असे आवाहन माडखोल येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले आहे.