सरपंच सौ. सावित्री पालेकर यांनी मानले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे आभार
सावंतवाडी,दि.११: तालुक्यातील आंबोली हे थंड हवेचे ठिकाण म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे.
या ठिकाणी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी जगभरातून लाखो पर्यटक येत असतात.
मात्र असं असलं तरी आंबोली च्या काही पर्यटन स्थळापर्यंत दूरध्वनीची हवी तशी सुविधा नसल्याने पर्यटकांची मोठी गैरसोय होते.
ही बाब लक्षात घेऊन आंबोली सरपंच सौ.सावित्री पालेकर आणि येथील ग्रामस्थांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे आंबोली फणसवाडी भागात बीएसएनएल टॉवर साठी मागणी केली होती.
मंत्री नारायण राणे यांनी लोकांची गैरसोय ओळखून आंबोली फणसवाडी भागात बीएसएनएल टॉवर मंजूर केला आहे.
याबाबत आंबोली ग्रामपंचायत च्या माध्यमातून ग्रामसभेत अभिनंदनचा ठराव घेण्यात आला अशी माहिती आंबोली सरपंच सौ सावित्री पालेकर यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.