नेमळे तळवडे मुख्य रस्त्यावरील पुलाचे खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते भूमिपूजन…
सावंतवाडी, दि. ०८ : तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी नेमळे व तळवडे या दोन गावांना जोडणाऱ्या पुलासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी निवेदनातून केली होती. त्यानुसार माजी मुख्यमंत्र्यांनी १ कोटी ७० लाख रुपये निधी मंजूर केला होता.
आज खासदार विनायक राऊत व अरुण दूधवाडकर यांच्या हस्ते या पुलाचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी खासदार राऊत यांनी बोलताना याचे सर्व श्रेय रुपेश राऊळ यांना जाते अशा शब्दात श्री राऊळ यांचे कौतुक केले.
यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, शैलेश परब, बाळा गावडे, महिला जिल्हाप्रमुख जानवी सावंत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सावंतवाडी तालुका प्रमुख रुपेश राऊळ, शब्बीर मणियार,नेमळे सरपंच सौ दीपिका भैरे,उपसरपंच सखाराम राऊळ, बाळू माळकर,अशोक राऊळ, महिला तालुका संघटक भारती कासार,उपसरपंच सखाराम राऊळ,शाखा प्रमुख सचिन मुळीक,ग्रा.सदस्य स्नेहाली राऊळ, शितल नानोस्कर, सागर नेमळेकर, एकनाथ राऊळ, सिद्धेश नेमळेकर, आरती राऊळ, संजना नेमळेकर, महादेव नाईक, विनोद राऊळ, गुंडू पांगम, भाई राऊळ,आबा सावंत,गोपाळ राऊळ, संतोष पाताडे, वैभव परब, तलवडे सरपंच वनिता मेस्त्री, माजी सरपंच, यशोदा परब आदी ग्रामस्थ उपस्थित होते.