सावंतवाडी, दि.०७ : येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बांदा महिला उपतालुकाप्रमुख पदी श्रवणी धुरी, बांदा शहर संघटक पदी सोनाली निलेश राणे, तर शेर्ले शाखाप्रमुख पदी सौ.एकता शेर्लेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार खासदार विनायक राऊत जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर व जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना सावंतवाडी येथील शिवसेना कार्यालयात नियुक्तीपत्र देण्यात आले.
आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला बळकटी मिळावी या उद्देशाने या नियुक्त्या देण्यात आल्या असल्याचे यावेळी राऊळ यांनी सांगितले.
दरम्यान सावंतवाडी महिला तालुका संघटक सौ.भारती कासार यांनी उपस्थित नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, पक्षनिरीक्षक अशोक परब महिला तालुका संघटक भारती कासार तालुकाप्रमुख बाळू माळकर शहर संघटक ऋतिका दळवी, सोनुर्ली उपविभाग प्रमुख विनोद ठाकूर, नेमळे उपसरपंच सखाराम राऊळ, युवा सेना उपविभाग प्रमुख नितीन पांगम,आदी पदाधिकारी उपस्थित होते.