सावंतवाडी,दि.०४: निगुडे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नं. ०१ इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना तसेच अंगणवाडी विद्यार्थ्यांना मुंबई येथील उद्योगपती दीपक अगरवाल यांच्या सौजन्याने गावातील शासकीय निवृत्त अधिकारी गजानन नरसुले यांच्या सौजन्याने वह्या व खाऊ वाटप त्याचप्रमाणे सातवीच्या विद्यार्थ्यांना कॅम्लीन कंपास बॉक्स देण्यात आले . यावेळी जिल्हा परिषद शाळा निगुडे शाळा नं. १ च्या मुख्याध्यापिका गौरवी पेडणेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. व त्या म्हणाल्या कि मी शाळेत येऊन फक्त ६ महिने झाले परंतु गेली १५ वर्ष सातत्याने आपले वय ८१ वर्ष असताना सुद्धा रेल्वेतून प्रवास करत ते विद्यार्थ्यांना वह्या गावापर्यंत पोहोचवण्याचं काम नरसुले काका करतात. हे अतिशय एखाद्या तरुणास लाजवणारी गोष्ट आहे सामाजिक कार्यात नेहमी ते सहभाग घेतात हे खरोखर कौतुकास्पद आहे. आपण शाळेच्या वतीने त्यांचे आभार मानतो. यावेळी नरसुले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की मी या शाळेत शिकलो लहानाचा मोठा झालो शाळेला १०० वर्षे झाली आणि त्या शतक महोत्सव कार्यक्रमात मला सहभागी होता आलं. हे माझं मी भाग्य समजतो माझं शरीर जोपर्यंत साथ देईल तोपर्यंत मी शाळेला विद्यार्थ्यांना सहकार्य करणार असं त्यांनी अभिवचन दिलं.
यावेळी व्यासपीठावर निगुडे गावचे सरपंच लक्ष्मण निगुडकर यांनीही नरसुले यांच्या कामाचे कौतुक केले. यावेळी व्यासपीठावर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर जाधव, उपाध्यक्षा नेहा पोखरे, निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे,शिक्षक कुसाजी मेस्त्री,रूपाली नेवगी,पांडुरंग होंडे,नारायण नाईक, ग्रामस्थ कृष्णा निगुडकर आदी उपस्थित होते. तर शिक्षक पांडुरंग होंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.