सावंतवाडी,दि.०२: येथील स्थानिक टेम्पो चालक-मालक व्यवसायिकांनी शहरात ट्रान्सपोर्ट करणाऱ्या परप्रांतीय मुकादमाच्या विरोधात आज पासून आक्रमक भूमिका घेत सकाळपासून वाहतुक करणाऱ्या तब्बल ३ गाड्या अडवून त्या गाड्या पोलीस ठाण्यात नेण्यात आल्या.
जोपर्यंत परप्रांतीय लोक ट्रान्सपोर्ट व्यवसाय बंद करत नाही तोपर्यंत आम्ही माघारपातळीवर प्रयत्न घेणार नाही, असा पवित्रा स्थानिकांकडून घेण्यात आला आहे.
दरम्यान काल स्थानिक टेम्पो चालक-मालक आणि परप्रांतीय टेम्पो चालक यांच्यात बैठक झाली. परंतु त्या बैठकीत तोडगा न निघाल्याने आज सकाळी गाड्या रोखण्यात आल्या.
यावेळी राजीव वाळके,विशाल सावंत, सतिश नार्वेकर, आनंद मिशाळ, मिथिल सुभेदार, राजु गोवेकर, कादर बेग, आनंद वेरेकर, निलेश पेडणेकर, महेश गावडे, धाकू शेळके, जमीर शेख, महेश सबनीस, गणेश वेंगुर्लेकर, मुबिन बेग, कृष्णा राऊळ, प्रविण सावंत, विठ्ठल गुरव, विनोद राऊळ, गणपत टिळवे, रॉबर्ट फर्नांडिस, विजय धुरी, अभिजीत भोगण, राजन ठाकुर, शशिकांत धुरी, रविंद्र राऊळ, राहुल वरक, उमेश डाफळे, रफिक बेग, योगेश वरक, सागर परब आदी उपस्थित होते.