राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या दिपावली पाडव्याचे औचित्य…

0
73

अर्चना घारे परब, शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत…

बारामती,दि.१४: राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराचा दिपावली पाडवा दर वर्षी बारामतीत साजरा होत असतो. दिपावली पाडव्याचे औचित्य साधून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांसह अनेक नागरिक शरद पवार साहेबांची भेट घेण्यासाठी, त्यांचे शुभाशीर्वाद घेण्यासाठी बारामतीला येतात. शरद पवार ही आलेल्या प्रत्येक व्यक्तीची भेट घेऊन आपुलकीने विचारपूस करतात. एखाद्या राजकीय पक्षातील कौटुंबिक जिव्हाळ्याचे हे एकमेव अद्वितीय उदाहरण आहे.

राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग अध्यक्ष सौ. अर्चना घारे परब यांनीही दिपावली पाडव्याच्या निमित्ताने सहकुटुंब बारामतीला भेट देत शरद पवार व खासदार. सौ. सुप्रियाताई सुळे यांची भेट घेतली. “दर वर्षी दिपावली पाडव्याला आम्ही बारामतीत येऊन आमच्या दैवताचे दर्शन घेतो, व त्यांचे आशीर्वाद घेतो. यावर्षीही आदरणीय पवार साहेबांची भेट घेतली व आशीर्वाद घेतला असे यावेळी घारे यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे.

ही भेट येत्या काळात मला ऊर्जा देणारी आहे.” अशी भावना अर्चना घारे परब यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here